नमस्कार मंडळी,
आज आपण कीटकनाशक आणि त्याची धोक्याची पातळी कशी ओळखावी हे पाहणार आहोत.
कीटकनाशक खरेदी करताना त्या वरील लेबलची माहिती असणे फार महत्वाची आहे. हे शेतकर्यांना वापर करण्यासाठी खूप उपयुक्त माहिती आहे. जेणेकरून कीटकनाशक साठा, त्याची हाताळणी, वापर आणि विल्हेवाट लावण्याचे निर्णय शेतकरी सहज घेऊ शकेल . प्रत्येक कीटकनाशक पदार्थावर त्याचे स्वतःचे लेबल/ शिक्का असते . जे कीटकनाशके खरेदी करतात आणि वापरतात त्यांना लेबलची व्याख्या कशी करावी हे माहित असणे आवश्यक आहे. खालील लेबल ची माहिती वापरकर्ता , समाज आणि पर्यावरण यांचे रक्षण करते.
योग्य लेबल नसलेले कीटकनाशक खरेदी करू नका किंवा साठवू नका. त्या लेबल वर चित्रालेख माहिती उपलब्ध असते. जेणेकरून ते कीटकनाशक किती विषारी आहे किंवा ते कसे वापरावे, हे सूचित करते . कीटकनाशकांवर असलेली चिन्हे (आकार आणि चित्रालेख) आणि सांकेतिक शब्द हे कीटकनाशक च्या धोक्याचे प्रकार दर्शवतात
- धोक्याची पातळी दर्शविणारी विशिष्ट आकार:
१.
लेबलवरील अष्टकोन हे अत्यंत धोकादायक अशी पातळी दर्शवितात. "धोका" हा सांकेतिक शब्द त्याच्याशी निगडित आहे.
२.
लेबलवरील समभुज चौकोण(diamond shape) हे मध्यम धोकादायक अशी पातळी दर्शवितात. "चेतावणी" हा सांकेतिक शब्द त्याच्याशी निगडित आहे.
३.
लेबलवरील उलटा त्रिकोण हे कमी धोकाायक अशी पातळी दर्शवितात. "सावध " हा सांकेतिक शब्द त्याच्याशी निगडित आहे.
- सावधगिरी दर्शविणारी विशिष्ट चित्रलेख:
चार महत्त्वपूर्ण सांकेतिक चिन्हे आणि शब्द जे कीटकनाशकांची संभाव्य धोके दर्शवतात.
१.
कवटी व दोन आडवी ठेवलेली हाडे ही खूण कीटकनाशक विषारी असल्याचे दर्शवितात. हा पदार्थ मुख, त्वचा किंवा श्वसन मार्ग यांच्या संपर्कात आल्यास धोकादायक ठरतो.
२.
ज्वाळा हि खूण कीटकनाशक ज्वलनशील असल्याचे दर्शवितात. हा पदार्थ लगेच पेट घेऊ शकतो.
३.
हाडांचा हाथ हि खूण कीटकनाशक उपरोधिक, गंज चढणारा पदार्थ असल्याचे दर्शवितात.
हा पदार्थ एकतर अंमल किंवा क्षार आहे. त्वचा किंवा डोळे याना उपरोधिक किंवा गंज चढणारा आहे. ज्यामुळे रासायनिक जळजळ होऊ शकते.
४.
स्फोटक प्रतीक असलेली खूण कीटकनाशक विस्फोटक असल्याचे दर्शवितात.उ.दा. दबावग्रस्त कॅन मधील कीटकनाशक
भारतामध्ये कीटकनाशक कंटेनर वरील विषाच्या तीव्रतेचे प्रमाण असलेला शिक्का हे अनिवार्य(अत्यावश्यक) असा शिक्का आहे. 1968 च्या कीटकनाशक कायदा आणि 1971 च्या कीटकनाशके नियमप्रमाणे त्यांची योजना केलेली आहे. लेबलिंग मध्ये १९७१ च्या कीटनाशक नियमानुसार ब्रँड चे नाव, निर्मात्याचे नाव, प्रतिजैविके इ. समाविष्ट केलेली असतात. लेबलवर असलेले रंगांचे सांकेतिक शब्दकोश सामग्रीच्या विषारीपणाचे प्रतिनिधित्व करतो. अशा प्रकारे लेबलिंग हे ४ प्रकारच्या रंग प्रस्तावित करते. लाल, पिवळा, निळा आणि हिरवा.
लाल = अत्यंत विषारी
पिवळा = खूप विषारी
निळा = मध्यम किंवा मर्यादेच्या आत विषारी
हिरवा = किंचित, थोडासा विषारी
आपली प्रतिक्रिया कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
नवनवीन update साठी आमचे फेसबुक page like करा.