नमस्कार शेतकरी मित्रांनो,
पारंपरिक पद्धतींना मागे सारत नव-नवीन तंत्रज्ञान आज शेतकरी वापरत आहेत. ड्रोन चा फवारणी साठी वापर, विद्राव्य खाते, ठिबक सिंचन, हायड्रोपोनिक शेती,नॅनो युरिया, नॅनो डीएपी अश्या बऱ्याच नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. त्याच पैकी मल्चिंग प्रणाली खूप शेतकरी वापरताना दिसत आहेत. तर आज आपण मल्चिंग कसे करावे, त्याचे फायदे काय आहेत, ह्यावर माहिती पाहणार आहोत.
mulching म्हणजे मातीवर असणारे आच्छादन. मातीचा वरचा थर झाकून, पिकास पोषक वातावरण तयार करणे म्हणजे मल्चिंग. पूर्वी पासून, पाला पाचोळा मातीवर टाकून आच्छादन तयार करण्याची पद्धत बरीच जणांना माहित असेल. त्यामुळे मातीचे बाष्पीभवन कमी होते व संरक्षणात्मक आच्छादन तयार होते. त्याच प्रमाणे, अलीकडील काळात पेपर मल्चिंग प्रणाली विकसित झाली आहे. साधारणतः मल्चिंग चे २ प्रकार पाहायला मिळतात.
मल्चिंगचे असे प्रकार आहेत -
सेंद्रिय आच्छादन/ मल्चिंग:
शेतातील सुकलेला पालापाचोळा, गवत,भाताचा/गव्हाचा पेंडा, भुसकट, सुकलेली पाने, झाडाच्या साली, पिकांचे अवशेष अशा नैसर्गिक पदार्थ पासून सेंद्रिय आच्छादन केले जाते. या आच्छादनाचे कालांतराने विघटन होते. त्यामुळे ते वारंवार बदलावे लागते. तसेच यामुळे पिकांना कीटकांचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
*सेंद्रिय मल्चिंग चे खालील प्रकार पाहायला मिळतात.
१. Grass क्लिपिंग:
गवत हे देशभरातील सर्वात मुबलक आणि सहज उपलब्ध असलेल्या पालापाचोळ्यांपैकी एक आहे. गवत ताजे मिसळल्यास ते मातीला नायट्रोजन प्रदान करते. तथापि, पावसाळ्यात हिरवे गवत वापरल्यास त्याच्या स्वतःच्या मुळांच्या विकासास कारणीभूत ठरू शकते जे वनस्पतींच्या वाढीस हानिकारक ठरेल. त्यामुळे कोरड्या गवताचा पालापाचोळा म्हणून वापर करण्याचा सल्ला दिला जातो.
२. Straw/वाळलेल्या गवताच्या काड्या:
भात आणि गव्हाचा पेंढा हे फळ आणि भाजीपाला उत्पादनासाठी वापरले जाणारे सर्वात सामान्य मल्चिंग साहित्य आहेत. जरी पेंढा पोषक मूल्यांमध्ये कमी आहे परंतु कुजल्यानंतर ते माती अधिक सुपीक बनवते. सेंद्रिय आच्छादन सामग्रीमध्ये, इतर आच्छादनांच्या (गवत, पाने आणि पानांचा साचा) तुलनेत पेंढ्याचे आयुष्य जास्त असते.
३. Bark clipping/झाडाचे साल:
हे चांगले पालापाचोळा पदार्थ आहेत कारण ते दीर्घकाळ टिकतात आणि जमिनीखालील जमिनीत योग्य वायुवीजन देतात. हार्डवुड बार्क क्लिपिंग्जमध्ये सॉफ्टवुडपेक्षा जास्त पोषक असतात परंतु झाडाची साल सहजपणे आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध नसते आणि काही झाडाची साल उत्पादनांमुळे फायटोटॉक्सिसिटी होऊ शकते.
४. Saw dust/लाकडाचा भुसा:
लाकडाच्या फिनिशिंग ऑपरेशन दरम्यान मिळणाऱ्या सॉ डस्टचे पौष्टिक मूल्य फारच कमी असते कारण त्यात पेंढ्याचे फक्त अर्धे पोषक असतात. ते हळूहळू विघटित होते. ते अम्लीय असल्याने आम्लयुक्त जमिनीत त्याचा वापर करू नये.
५. कम्पोस्ट:
कंपोस्ट: सर्वोत्तम मल्चिंग सामग्रीपैकी एक कंपोस्ट आहे. हे जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते, त्याचे आरोग्य सुधारते आणि थोड्या प्रमाणात पोषकद्रव्ये जोडते. कंपोस्टमध्ये किंचित अम्लीय असण्याची प्रवृत्ती असल्याने, क्षारीय निसर्ग असलेल्या मातीसाठी हे विशेषतः फायदेशीर जोड आहे. तथापि, कंपोस्टिंगचा एक तोटा आहे. त्यात तण रोखण्याची शक्ती कमी आहे कारण ते खूप बारीक आणि पोषक तत्वांनी भरलेले आहे.
६. Wood chips:
झाडाच्या सालीच्या आच्छादन सारखे. भरपूर पाने मिसळलेल्या ताज्या लाकडाच्या चिप्स वापरत असल्यास, कंपोस्टिंग फायदेशीर ठरू शकते.
७. वृत्तपत्र:
मातीमध्ये थोडेसे सेंद्रिय पदार्थ टाकून, वृत्तपत्र आच्छादनामुळे तणांची वाढ मर्यादित होण्यास मदत होते. एक ते दोन सेंटीमीटर जाडीचे वृत्तपत्राचे थर वापरा, नंतर रेव, खडे किंवा अन्य पदार्थाने कडा सुरक्षित करा. वाऱ्याच्या दिवसात, वृत्तपत्र मल्चिंग शक्यतो टाळावे. रंगीत शाईचे वर्तमानपत्र देखील टाळावे कारण ते धोकादायक असतात.
*अजैविक आच्छादन/ मल्चिंग:
अशा प्रकारच्या मल्चिंगमध्ये प्लास्टिक फिल्म, पॉलिथिन, जिओटेक्स्टाईल्स आच्छादनासाठी वापरले जाते. सध्या व्यावसायिक शेतीमध्ये अजैविक मल्चिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. कारण यामध्ये वापरले जाणारे प्लास्टिक हे सहजासहजी विघटित होत नाही. हे मल्चिंग अनेक प्रकारात उपलब्ध आहे.
प्लास्टिक मल्चिंग पेपर चे प्रकार आणि त्याचे गुणधर्म:
१. पारदर्शक प्लास्टिक मल्चिंग पेपर:
या पेपरच्या आच्छादनातून सूर्याची किरणे थेट जमिनीपर्यंत पोहोचू शकतात त्यामुळे माती गरम होऊन जमिनीचे तापमान वाढते. अशा प्रकारचा पेपर हा मुख्यता थंड हवामानात वापरला जातो. हिवाळ्यात स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी हा पेपर उपयुक्त आहे.
२. काळा मल्चिंग पेपर:
या मल्चिंग पेपरच्या दोन्ही बाजू काळ्या रंगाच्या असतात. सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचून तणाची उगवण होऊ नये म्हणून या प्रकारचा पेपर वापरतात. काळा कलर हा प्रकाश खेचून घेणारा असल्यामुळे तो जास्त गरम होतो त्यामुळे त्याच्या उष्णतेचा त्रास पिकांना होतो.
३. व्हाईट- ब्लॅक मल्चिंग पेपर:
नावाप्रमाणेच या मल्चिंग पेपरची एक बाजू काळी व दुसरी बाजू पांढरी असते. हा दोन्ही बाजूने वापरता येतो. तुलनेने हा पेपर जास्त गरम होत नाही.
४. सिल्वर- ब्लॅक मल्चिंग पेपर:
हा पेपर शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. हा पेपर वापरताना सिल्वर बाजू वर करूनच वापरला जातो कारण सिल्वर कलरच्या चकाकी मुळे सूर्यप्रकाशाचे रिफ्लेक्शन होते. या गुणधर्मामुळे पेपर थंड राहतो परिणामी जमीन गरम होत नाही. हा मल्चिंग पेपर प्रत्येक पिकासाठी वापरता येतो.
५. इन्फ्रारेड प्रकाशाला पारदर्शक मल्चिंग पेपर:
या मल्चिंग पेपर मधून सूर्यप्रकाशातील इन्फ्रारेड किरणे जमिनीपर्यंत पोहोचतात. परंतु तण वाढीसाठी उपयुक्त किरणे जमिनीवर पोहोचत नाहीत. त्यामुळे या मल्चिंगच्या वापरामुळे शेतात तण वाढत नाही.
६. रंगीत मल्चिंग पेपर (पिवळा- तपकिरी):
हा पेपर जमिनीवर पसरताना तपकिरी बाजू जमिनीलगत आणि पिवळी बाजू वरच्या दिशेला असते. पिवळा रंग पांढऱ्या माशीला आकर्षित करतो म्हणून जेव्हा पांढऱ्या माशा सूर्याच्या उष्णतेमुळे या पेपरच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांचा मृत्यू होतो. ज्या भागात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या भागात याचा विशेष वापर केला जातो.
७. विणलेले(सच्छिद्र) मल्चिंग पेपर:
विशेषता गादीवाफ्यासाठी हा पेपर वापरला जातो. स्ट्रॉबेरी सारख्या पिकात त्याचा वापर केल्याने चांगले उत्पादन मिळवणे शक्य होते. अधिक काळ टिकणाऱ्या छोट्या झाडासाठी हे मल्चिंग पेपर फायदेशीर ठरतात.
मल्चिंग चे फायदे:
१. जमिनीतील ओलावा राखते:
मल्चिंगमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील आर्द्रतेचे बाष्पीभवन रोखता येते. त्यामुळे मातीमधील/जमिनीतील पाणी कमी होण्याचे प्रमाण रोखता येते. मल्चिंगमुळे मातीच्या पृष्ठभागावरील हवेचा प्रवाह खंडित होऊन ओलावा कमी होतो. मल्चिंगमुळे मातीचा घट्ट पण कमी होतो आणि मातीची पारगम्यता म्हणजेच पाणी झिरपण्याची क्षमता सुनिश्चित करण्यात मदत होते, जास्त प्रमाणात वाहून जाण्यापासून बचाव होतो, मातीची धूप रोखते आणि परिणामी मातीच्या उप-पृष्ठभागाच्या स्तरांमध्ये पाणी झिरपण्यास मदत होते.
२. जमिनीचे तापमान नियंत्रण:
पालापाचोळा जमिनीच्या पृष्ठभागावर इन्सुलेशन थर म्हणून काम करतो. म्हणजेच विद्युतप्रवाहपासून बचाव करत येते. हे शोषून घेतलेली उष्णता जमिनीतून मुक्त होण्यास रोखते त्यामुळे उष्णता या जमिनीत उष्णता टिकून राहते. अशा प्रकारे संपूर्ण वर्षभर मातीचे सरासरी तापमान mulching न केलेल्या मातीपेक्षा किंचित जास्त राखते. उन्हाळ्यात, जमिनीच्या पृष्ठभागावर थेट सूर्य प्रकाश न पडल्यामुळे मल्चिंग खालील जमिनीचे सरासरी कमाल तापमान कमी राहते.
३. तण वाढीस प्रतिबंध:
जवळजवळ सर्व वनस्पतींना स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते. मल्चिंग हे विशेषत: प्रकाशासाठी अभेद्य (काळे पॉलिथिन), मातीच्या पृष्ठभागावर पडणारा प्रकाश वगळतात आणि तणांच्या वाढीस रोखतात. लहान, कमी वाढणारी आणि कमी जोमदार तणांना पालापाचोळा पसरवून नियंत्रित करणे खूप सोपे आहे.
४. जमिनीची धूप वाढीस रोखणे:
मल्चिंगमुळे मातीवर हवेचा प्रभाव कमी होतो, पावसाच्या सरींचा प्रभाव कमी होतो,आणि मातीची धूप रोखण्यास मदत होते. वर्षानुवर्षे जमिनीवर सतत मल्चिंग केल्यास जमिनीची भौतिक-रासायनिक वैशिष्ट्ये सुधारतात आणि त्यामुळे हलक्या पोत असलेल्या मातीची धूप होण्याची शक्यता कमी होते.
५. कीड आणि रोग नियंत्रण
विशिष्ट प्रकारचे मल्चिंग केल्यास अनेक कीटक आणि रोगांना दूर ठेवता येते . कडुलिंबाची पेंड आणि त्याचे दाणे, घोड्याचे खत इत्यादि मातीत राहणाऱ्या अनेक कीटक आणि रोगजनकांवर प्रभावी आहेत. ओलावा टिकवून ठेवलेल्या मल्चिंगमुळे बुरशी रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. पालापाचोळा अंतर्गत राखलेली उबदार आणि ओलसर परिस्थिती अनेक फायदेशीर सूक्ष्मजीवांच्या वाढीस अनुकूल असते जे कीटकांचा प्रतिकार करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पडतात.
योग्य मल्चिंग पेपरची निवड:
सध्या बाजारामध्ये मल्चिंग पेपरच्या अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत. यामधून आपल्या पिकासाठी कोणता मल्चिंग पेपर योग्य ठरेल याचा प्राथमिक अंदाज असणे शेतकऱ्याला खूप आवश्यक आहे. आच्छादनाचा जास्तीत जास्त फायदा मिळून, उत्पादनात वाढ होण्यासाठी हा निर्णय/निवड शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.
पीक प्रकारानुसार आपण मल्चिंग फिल्मची जाडी निवडावी.
मल्चिंग पेपर खरेदी करत असताना लांबी- रुंदी विचारूनच खरेदी करावी. शक्य झाल्यास आपण खरेदी करीत असलेला बंडल खोलून, ओढून ताणून त्याचा ताण, चिवटपणा, कलरची शायनिंग हे सर्व तपासूनच खरेदी करावी. दर्जेदार पेपरची खरेदी करण्यासाठी आपल्या माहितीतील दुकानदाराकडूनच खरेदी करावी.
शेतकरी मित्रांनो तर मग मल्चिंग संबंधी माहिती कशी वाटली? तुमचे अनुभवही कॉमेंट बॉक्स मध्ये share करा. काही शंका असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये विचारा. आणि तुमच्या प्रतिक्रिया पण नोंदवा. धन्यवाद !!!
Like Facebook page to stay updated!