सूक्ष्म पोषक घटक (Micro-nutrients) आणि त्याचे कार्य

| 04 Mar 2018 | 25372 |

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आज आपण सूक्ष्म पोषक घटका बद्दल माहिती घेणार आहोत. काही दिवसापूर्वी आपण नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK)  बद्दल माहिती घेतली होती. ज्याप्रमाणे नत्र, स्फुरद आणि पालाश यांची आपल्या पिकांना गरज असते त्याच प्रमाणे सूक्ष्म पोषक घटक पिकांना गरजेचे असतात.  सूक्ष्म पोषक घटक संतुलित पिक पोषण क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावतात. पण या पोषक घटकांची गरज खूप कमी प्रमाणात असते म्हणून त्याला सूक्ष्म पोषक घटक असे म्हणतात.

पिकांमध्ये फुलधारणा, फळधारणा रोगप्रतिकारकशक्ती यासारख्या कार्यांमध्ये सूक्ष्म पोषक घटकांची गरज असते. त्यासाठी पीक लागवडीच्या आधी माती परीक्षण केल्यास आपणास आपल्या शेतात कोणत्या घटकाची कमतरता आहे हे लक्षात येईल आणि त्या प्रमाणे आपण सूक्ष्म पोषक घटकाचा वापर आपल्या शेतात योग्य प्रकारे करू शकतो. सर्वसाधारणपणे पानाच्या रंगावरून सूक्ष्म पोषक घटकाची कमतरता ओळखता येते.

एकंदरीत जर पहिलं तर १६ पोषक घटक असतात. त्यामध्ये १३ अन्नद्रव्य जमिनीतून घेतली जातात. तर ३ हवा आणि पाण्यातून मिळतात. नेहमी आपण जो आपल्या पिकांना खतांचा पुरवठा करतो त्यातून नत्र, स्फुरद, आणि पालाश त्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे घटक मिळत असतात. खाली दिल्या प्रमाणे १६ पोषक घटकांची वर्गवारी करण्यात अली आहे.

  • हवा आणि पाण्याद्वारे मिळणारे घटक : कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन
  • महत्वाचे पोषक: नायट्रोजन(N), फॉस्फोरस(P), पोटॅशियम(K) [याची माहिती आपण काही दिवसांपूर्वी घेतली आहे ]
  • माध्यमिक पोषक: कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर
  • सूक्ष्मपोषक: बोरॉन (boron - B), क्लोरीन (chlorine - Cl), तांबे (copper - Cu), लोहा (iron - Fe), मॅगनीज (manganese - Mn), मोलिबडेनम (molybdenum  - Mo) आणि जस्त (zinc - Zn).



बोरॉन (boron - B): बोरॉन हे पिकांमध्ये कोशिका विभाजनाचे (cell division) कार्य करतात. या पृथ्वीवरील कोणत्याही सजीवाची वाढ होत असताना त्याच्या कोशिकाचे  विभाजन होत असते. कोशिका विभाजनामध्ये व्यतेय आला तर पिकांची योग्यप्रकारे वाढ होत नाही. बोरॉनच्या कमतरता हि कोंबांच्या वाढीमध्ये फूल आणि फळामध्ये दिसून येते.

क्लोरीन (chlorine - Cl): क्लोरीन मुळे प्रकाशसंस्लेषणक्रिया सुधारते. क्लोरीनचा योग्य वापर केल्यास धान्य पिकांच्या उत्पादनात चांगली वाढ होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पालाश Potassium (K) आणि क्लोरीन एकत्रित प्रकाशसंस्लेशन क्रिया योग्यरीत्या कार्यरत ठेवतात.तसेच पिकांच्या अंतर्गत पाणी व्यवस्थापनामध्ये पालाश आणि क्लोरीन महत्वाची भूमिका पार पडतात.

तांबे (copper - Cu):  तांबे प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक भूमिका पार पाडत असते.  पिकांच्या श्वसन प्रक्रियेसाठी आवश्यक असते. पिकांच्या फळाची चव, रंग आणि फुलाचा रंग हा योग्य प्रमाणात copper असल्यास उत्तम होतो. तांबे स्थिर आहे. म्हणजेच त्याच्या कमतरतेची लक्षणे नवीन पानांमधे उद्भवतात.नवीन येणारी पाने लहान येतात आणि पानांना तेज नसतो.

लोहा (iron - Fe): लोह हा घटक अत्यंत महत्वाचा घटक आहे. क्लोरोफिल(हरित द्रव्य) मुळे पानांना हिरवा रंग प्राप्त होतो.वनस्पती  लोह शिवाय क्लोरोफिल तयार करू शकत नाहीत. शिवाय, त्या ऑक्सिजन पण घेऊ शकत नाहीत. म्हणून लोह हा घटक पानांचा हिरवा रंग कायम ठेवण्यास मदत करतो.


मॅगनीज (manganese - Mn): प्रकाशसंश्लेषण, श्वासोच्छ्वास, आणि नायट्रोजन योग्य पद्धतीने ग्रहण करणे यासारख्या विविध कार्यासाठी  वनस्पतींमध्ये मँगनिजचा वापर केला जातो. मँगेनजमुळे  पराग उगवण, परागनलिकामध्ये वाढ होते आणि रोगजनकांच्या प्रतिकारशक्तीशी मध्ये वाढ होते.मॅगनीजच्या कमतरतेमुळे पिकांची वाढ खुंटते आणि पिके आहे त्याच स्थितिमध्ये राहतात.  

मोलिबडेनम (molybdenum  - Mo): पिकामध्ये असलेले नायट्रेट किंवा मातीतून घेतलेले नत्र प्रोटीन मध्ये रुपांतरीत करण्यासाठी मोलिबडेनम चा उपयोग होतो. मोलिबडेनम योग्य प्रमाणात ना मिळाल्यास नत्राची कमतरता असलेली लक्षणे दिसून येतात. आणि त्यामुळेच नायट्रेट न वापरता संचय झाल्याने पानांची कडा कारपल्यासारख्या दिसतात.

जस्त (Zn): हे आठ आवश्यक पोषक घटकांमधील एक आहे. वनस्पतींसाठी कमी प्रमाणामध्ये हे आवश्यक असले तरी रोपांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. जस्त  हे झाडांमधील अनेक एंझाइम्स आणि प्रथिने यामधील एक मुख्य घटक आहे. जस्त हे विशिष्ट प्रथिनांच्या संश्लेषणासाठी जबाबदार असलेल्या एन्झाइम ला  सक्रिय करतात. हे क्लोरोफिल आणि काही कार्बोहायड्रेट निर्मिती, स्टार्च चे साखरेत रूपांतर करणे, वनस्पतींच्या ऊतीमध्ये थंड तापमान रोखण्यात मदत करते.

 मित्रांनो आपल्याला हि माहिती कशी वाटली हे खाली दिलेल्या comment बॉक्स मध्ये नोंदवा. लवकरच आपल्यासाठी नवीन विषय घेउन येईन तो पर्यंत धन्यवाद !!!
 


  

  • Social Sharing
  • Like Facebook page to stay updated!

  • Recent Articles
  • No Recent Articles
Share article on:
  

Add comment

Success! Comment Added successfully. Admin will moderate and publish your comment soon!
List of comments
Number of comments: 43

माहिती खूपच आवडली

Best articals

30-Mar-2018 10:32 AM

निलेश

प्रत्येत आर्टीकलमधील माहीती सुरेख व ऊपयोगी आहे. एक सुचवावसं वाटलं; NPK व मायक्रो - न्यूट्रीअंटचो नैसर्गिक स्त्रोतांबद्दल माहीती दिल्यास अजून ऊपयुक्त होईल.

09-Apr-2018 07:03 AM

Mast

Best article for begginers

24-Apr-2018 06:31 PM

Bhor sahani Tulashiram

Very essential to farmers .

24-Jun-2018 05:43 PM

Harshal Balinge

तुमच्यामुळे शेतकऱ्याला खूप मदत होते आणि त्यासाठी धन्यवाद.

06-Jul-2018 08:39 PM

Harshal Balinge

तुमच्यामुळे शेतकऱ्याला खूप मदत होते आणि त्यासाठी धन्यवाद.

06-Jul-2018 08:39 PM

Prithviraj shinde

माहिती साठी धन्यवाद

15-Jul-2018 12:41 PM

Prithviraj shinde

माहिती साठी धन्यवाद

15-Jul-2018 12:41 PM

sama

Mast mahiti

31-Aug-2018 01:52 PM

suresh govardhane

क्लोरीन खताचे नाव सांगा

04-Oct-2018 10:44 PM

suresh govardhane

पाॅलिहाऊस गुलाबाची दांडी कोणत्या खताने लांब मिळेल

04-Oct-2018 10:50 PM

अजय शिंदे

आम्ही चादवडला ( नाशिक) राहतो माती परीक्षन केद्र कुठे आहे

12-Nov-2018 11:32 PM

yuvraj patil

खुपच चांगल्या पद्धतीने माहिती दिली आहे

26-Nov-2018 08:00 AM

Sandip Valase

जर आपण micronutrient साठी micronutrient ची बॅग टाकली तर चालेल का, किंवा वेगवेगळे घटक टाकावे लागतील

10-Apr-2019 10:12 AM

रोशन जनार्दन विधाते

खूपच सुंदर माहिती सर्व आर्टिकल मध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे फक्त थोडं अजून सविस्तरपणे सांगितल्यास जास्त जास्त फायदा होईल पिकांना त्यांच्या कोणत्या अवस्थेत कोणत्या प्रकारच्या एनपीके किंवा मायक्रोन्यूट्रिएंट ची गरज आहे हे थोडं सविस्तर सांगावे धन्यवाद खूप खूप धन्यवाद

07-May-2019 08:03 PM

रोशन जनार्दन विधाते

खूपच सुंदर माहिती सर्व आर्टिकल मध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे फक्त थोडं अजून सविस्तरपणे सांगितल्यास जास्त जास्त फायदा होईल पिकांना त्यांच्या कोणत्या अवस्थेत कोणत्या प्रकारच्या एनपीके किंवा मायक्रोन्यूट्रिएंट ची गरज आहे हे थोडं सविस्तर सांगावे धन्यवाद खूप खूप धन्यवाद

07-May-2019 08:03 PM

Pruthviraj hiremath

छान माहिती मिळाली.

01-Jun-2019 08:26 AM

Kaustubh Dhikale

माहिती अतिशय उपयोगी आहे. ज्यांना शेती क्षेत्रात सुरुवात करायची असेल त्यांच्यासाठी तर बहुमूल्य अस ज्ञान आहे. मी वरील माहिती बद्दल समाधानी आहे.

14-Jun-2019 08:05 AM

Karan jaywant chavan

Best

29-Jun-2019 11:40 PM

PRANAV MALI

NPK सोबत याला दिल तर याचे एकरी प्रमाण किती द्यावे लागेल ?

07-Jul-2019 07:50 PM

Sanjay Bhalerao

आपली माहीती खुपच छान आहे .प्रत्येक पिकाचे आदर्श खत व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन द्यावे ही नम्र विनंती.

14-Jul-2019 08:48 PM

Sanjay Bhalerao

आपली माहीती खुपच छान आहे .प्रत्येक पिकाचे आदर्श खत व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन द्यावे ही नम्र विनंती.

14-Jul-2019 08:48 PM

SATISH WALSING PATIL

Fine

16-Aug-2019 09:35 PM

Nitish

खूप छान माहिती आहे

21-Jan-2020 09:10 AM

Amol palve

Best

26-Jun-2020 03:57 PM

प्रदीप वसंत राळ

खूपच छान माहिती मिळाली ही अशी माहिती मिळविण्यासाठी मी बऱ्याच दिवसापासून प्रयत्नात होतो ,पण सांगावस वाटते की प्रत्येक पिकाला एन पी के (जसे की कापूस, केळी आणि इतर पिके) आणि दुसरी खत किती प्रमाणात द्यावे याचे सुध्दा मार्गदर्शन करावे

14-Jul-2020 04:50 PM

प्रदीप वसंत राळ

खूपच छान माहिती मिळाली ही अशी माहिती मिळविण्यासाठी मी बऱ्याच दिवसापासून प्रयत्नात होतो ,पण सांगावस वाटते की प्रत्येक पिकाला एन पी के (जसे की कापूस, केळी आणि इतर पिके) आणि दुसरी खत किती प्रमाणात द्यावे याचे सुध्दा मार्गदर्शन करावे

14-Jul-2020 04:50 PM

तुषार घुडे

खूप छान माहिती दिली आहे आपण

01-Dec-2020 12:09 PM

Bhushan Nikam

Khup chan article... What's app group asel tar 8208941866 hya number la add kara. Thanks

03-Dec-2020 07:56 PM

Sachin sakharam rathod

Nice

03-Sep-2021 03:02 PM

Venkatreddy godalwar

Good information. Thank u sir l hope u will give information about fungicide and there role in plant development and resistance

15-Jan-2022 10:02 PM

Venkatreddy godalwar

Good information. Thank u sir l hope u will give information about fungicide and there role in plant development and resistance

15-Jan-2022 10:02 PM

Patil viresh

Namaskar sir, sir pratekka shabdacha arth lihilat te pan Readymade madhi thanku sir KEEP IT UP

12-Mar-2022 04:57 PM

Tulsidas D Salvi

फार छान माहिती आहे, माझ्याकडे 15 mangeo ट्री आहेत पण त्यांची वाढ झाली की त्यांना कीड लागते पाने कीड कुरतडतात. फणसाच्या झाडांची वाढ होत नाही

24-Apr-2022 03:13 PM

Gulabsing Pawara

This fertilizer information very good.

26-May-2022 02:49 PM

Tushar

Mast mahiti

23-Aug-2022 06:47 PM

Nilesh Sureshrao Ahire

Nice information

07-May-2023 06:48 PM

Vikas

मला माहिती आवळली

21-Jun-2023 01:03 PM

विलास मेश्राम

माहिती खूप छान आहे

21-Jun-2023 01:07 PM

Vilas Meshram

Best artcals

04-Jul-2023 11:34 AM

Brajesh Parate

Thanks

29-Feb-2024 07:59 PM

Vishal Deshkari

सर खुप छान माहिती दिली सर 🥰

15-Aug-2024 07:39 PM

Nitin Thombre

Chyan

17-Aug-2024 08:16 PM


Back to Articles List